विवरण श्लोक १

विश्वं दर्पणदृश्यमाननगरी तुल्यं निजान्तर्गतं.

पश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया ।  

यस्साक्षात् कुरु ते प्रबोध समये स्वात्मानमेवाद्वयं ,

तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ॥1||

 आरशात एखाद्या नगरीचे प्रतिबिंब पहावे आणि तीच खरी नगरी आहे असे वाटावे. किंवा झोपले असताना स्वप्नात पाहिलेली गोष्टच प्रत्यक्षात खरी आहे असे वाटते त्याप्रमाणे विश्व हे आत्मतत्त्वाच्या ठिकाणी प्रतिबिंबित होते.प्रतिबिंब हा शेवटी आभास असतो, सत्य नाही, याची कालांतराने जाणीव होते. त्याप्रमाणेच अज्ञान आणि मायेच्या आवरणामुळे विश्व हे ब्रह्माहून वेगळे आहे असे वाटते.  प्रत्यक्षात एकमेवाद्वैतीय ब्रह्म हे नित्य आणि विश्व हे अनित्य, त्यावर भासमान होणारे आहे. मन, इंद्रिये, बुद्धी यांना हे प्रतिबिंबच गोचर होते. खरे आत्मतत्त्व नाही. नित्य काय आणि अनित्य काय हे  ज्ञान केवळ प्रबोध वा आत्मज्ञान जेव्हा होते त्याचवेळी पटते. हे आत्मज्ञान ज्या शंकरामुळे होते त्या गुरुमूर्तीला माझा नमस्कार असो.

या पहिल्याच श्लोकात श्रीमत शंकराचार्य त्यांच्या सुप्रसिद्ध ‘मायावादाच्या’ सिद्धांताचा उल्लेख करतात. ‘माया’ या शब्दाचा अर्थ अगदी सरल आहे. ‘या मा सा माया ।‘ जी खरी (नित्य ) नव्हे ती माया. या मायेच्या दोन प्रकारच्या शक्ती आहेत . एक आवरण शक्ती आणि दुसरी विक्षेप शक्ती.  हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी अनेक वेळा श्री शंकराचार्यांनी रज्जुसर्पदृष्टांताचा आधार घेतला आहे. अंधारात एखादी दोरी दिसली तरीही आपणाला तो साप आहे असे वाटते. इथे मूळ दोरीच्या अस्तित्वाची जाणीव न होणं ही आवरण शक्ती आणि साप असल्यासारखे वाटणे, म्हणजे मूळ वस्तुपेक्षा भलतेच कसले ज्ञान होणे ह्याला म्हणतात विक्षेप शक्ती.

 आत्मतत्त्वाचे ज्ञान होण्याऐवजी आपल्याला आजूबाजूला जे विश्व दिसते ते नित्य वाटते यातही ब्रह्मतत्त्वाच्या ज्ञानावर आवरण पडणे ही मायेची आवरणशक्ती आणि त्याऐवजी भासमान , प्रतिबिंबित होणारे विश्व हेच सत्य वाटणे ही विक्षेप शक्ती. ज्ञानप्राप्ती झाली की मायेचे आवरण गळून पडते आणि यथातथ्य ज्ञान होते. हा प्रबोध घडवणारी गुरुस्वरूप देवता म्हणून दक्षिणामूर्ती या देवतेला माझा नमस्कार असो.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to विवरण श्लोक १

  1. sanjay kulkarni म्हणतो आहे:

    Very nice explanation.

  2. नरेंद्र गोळे म्हणतो आहे:

    विवरण खरेच सुबोध आहे. आवडले.

    आहे जे प्रतिबिंबरूप सगळे, ते जाणवे गाव हे, स्वप्नी जे दिसले घटीत घडता, प्रत्यक्ष भासे तसे ।
    स्वत्वाचा असला सुबोध घडवी त्या दक्षिणामूर्तिला, माझाही प्रणिपात सादर गुरूराजास भावे असे ॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s